Ticker

6/recent/ticker-posts

मार्डी जिल्हा परिषद गट 50 वर्षे चा अभेद्य बालेकिल्ला राष्ट्रवादी कडेच .

 


जोतिराम काटकर - सातारा जिल्हा प्रतिनिधी

    सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मार्डी जिल्हा परिषद गटात किंगमेकर माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ यांच्या सुनबाई  सौ. सोनालीताई मनोजकुमार पोळ यांनी दुसऱ्यांदा जिल्हा परिषद गटावरती निर्विवाद वर्चस्व राखले .

     50 वर्षे अबाधित असा किल्ला पुन्हा आपल्या कडे ( राष्ट्रवादी )खेचुन आणण्यात मनोजकुमार पोळ यांची रणनिती अविश्वसनीय अशीच होती  अस म्हणावे लागेल .

    भाजप कडुन भारतीताई संदीप पोळ या निवडणूक लढवत होत्या.  भाजप ने जोरदार तयारी करून ही यामध्येही पराभव स्विकारावा लागला . खरतर मार्डी जिल्हा परिषद मदे पाणी प्रश्न , रस्ते विकास करूनही भाजपचा पराभव होण हि चिंतेची बाब आहे . भाजपची रणनिती कुठे अयशस्वी झाली हे पहायला लागेल .

    शरद पवारांचे विश्वासु किंगमेकर कै. सदाशिवराव पोळ ( तात्या ) यांनी माण तालुक्यात 40 वर्षे सत्ता अबाधित ठेवली होती . त्याच विचारांचा वारसा पुढे घेऊन मनोजदादा पोळ यांनी तात्यांचा 50 वर्षे चा असलेला बालेकिल्ला अबाधित ठेवला. आणि जिल्हा परिषदेत सोनालीताई पोळ या दुसऱ्यांदा निवडून आल्या.