Ticker

6/recent/ticker-posts

पाटील कॉलेज मध्ये संत रविदास महाराज यांची जयंती



प्रतिनिधी :-  विजय गायकवाड

   रिसोड:- स्थानिक स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड यांनी आपले मत व्यक्त करताना "संत रविदास हे एक कवी, समाजसुधारक होते.

 संत रविदास महाराज यांच्या विचाराची व तत्वज्ञानाची बैठक धर्मनिरपेक्षवादी होती. भक्ती चळवळीच्या संदर्भातील संत रविदास महाराजांचे योगदान हे समाज सुधारक आणि अध्यात्मिक या दृष्टिकोनातील होते. त्यांच्या लिखाणातून सामाजिक बांधिलकीची व व्यापक ज्ञानाची कल्पना येते. हाच आदर्श व प्रेरणा घेऊन भावी समाजाने वाटचाल करावी. अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. सूत्रसंचलन प्रा. डॉ. केशव कोकाटे यांनी केले. आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश हनवते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसन जाधव व पंजाब सुर्वे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.