सतीश पांडे (कळमेश्वर प्रतिनिधी)
कळमेश्वर, दि. १९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजां बद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कळमेश्वर शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी केली. ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यां मधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन्भगवे ध्वज हातात घेऊन तरुणांसह आबाल वृध्द उत्साहात सहभागी झाले होते. विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, रून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध संस्थांत आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे शहराला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते. शहरातील शिव स्वराज्य ग्रुप च्या सदस्यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले यावेळी महाराजांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. या मानवंदना शहरातील नागरिक उपस्थित होते.तसेच शिव स्वराज्य उत्सव मंडळ चे अध्यक्ष अनिकेत शेंडे,विनोद अढाऊ यांचे सत्कार करण्यात आले.





Social Plugin