Ticker

6/recent/ticker-posts

येणेगुर ग्रामस्थांकडून शिवजयंती उत्साहात साजरी; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्ध अभिषेक.



उमरगा ता प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी 

 येणेगुर तालुका उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावच्या मुख्य हनुमान चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मावळा प्रतिष्ठान व शिवजन्मोत्सव समिती ग्रामपंचायत कार्यालय यांच्या व तसेच ग्रामस्थांच्या वतीने दुग्ध अभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. 

19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.45 वाजता ग्रामस्थांनी  व मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विश्वनाथ स्वामी, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अविनाश माळी, सचिव महेश माने, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गावचे प्रथम नागरिक सरपंच रेखाताई गुंजोटे व ग्रामपंचायत सदस्य संदीप बिराजदार, राहुल बनसोडे दिलीप भाऊ येडगे, ग्रामपंचायत अधिकारी श्री एल जी कांबळे साहेब , व येणेगुर बीट पोलीस अधिकारी व कर्मचारी व तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सचिन दूधभाते विजयकुमार घंटे, अमीर मुंन्शी, विरभद्र स्वामी, अविनाश स्वामी व शिवभक्त शिवरायांच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक घालत, फुलांची उधळण करून महाराजांना अभिवादन केले. यानंतर ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत विशेष पूजा संपन्न झाली. 

शिवजयंतीनिमित्त प्रसंगी बोलताना मान्यवरांनी शिवरायांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मावळा प्रतिष्ठान व शिवजयंती उत्सव समिती व ग्रामपंचायत कार्यालय येणेगुर व पोलीस प्रशासन तसेच गावातील तरुणांनी विशेष मेहनत घेतली.

जय जिजाऊ, जय शिवराय!