Ticker

6/recent/ticker-posts

किंनगाव राजा सज्ज; प्रकटदिन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष.




श्री संत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा रविवारी किंनगाव राजा येथे धार्मिक उत्सव

सिंदखेड राजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा ---  तालुक्यातील किंनगाव राजा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त रविवारी होणाऱ्या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. या सोहळ्याकडे परिसरातील भाविकांचे लक्ष लागले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

किंनगाव राजा येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराजांचा २१ वा प्रकटदिन सोहळा येत्या रविवार, माघ वद्य ७, दि. 08/02/2026 रोजी रविवार रोजी  भक्तिभावात साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० या वेळेत पारायण होईल. दुपारी ४.०० ते ४.३० या वेळेत अखंड वाचन, ४.३० ते ५.०० या वेळेत महाआरती तर सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा श्री गजानन महाराज मंदिर, किंनगाव राजा येथे होणार असून कार्यक्रमाचे आयोजक समस्त गावकरी मंडळी व श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान,किंनगाव राजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

परायणासाठी ग्रंथ, व्यासपीठ, आरती व भजन साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजकांनी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागामुळे किंनगाव राजा येथे होणारा प्रकटदिन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार.