Ticker

6/recent/ticker-posts

नॅशनल हाय वे वरील हायमास दिवे बंद – नागरिकांच्या जीवाशी खेळ.



सतीश पांडे [ कळमेश्वर प्रतिनिधी ]

कळमेश्वर -: नागपूर–काटोल राष्ट्रीय महामार्ग तसेच कामठी–अमरावती मार्गावर एक फेटरी माहूरझरी फाटा, बायपास माहूरझरी चौक, फेटरी छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर, सुपर मार्केट चिंचोली चौक या सर्व ठिकाणी हायमास दिवे बसवून तब्बल सहा ते सात महिने उलटून गेले तरी आजपर्यंत ते सुरू करण्यात आलेले नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर व शोकांतिके ची आहे.

रात्रीच्या वेळी या भागात पूर्णतः अंधार पसरलेला असतो. महामार्ग असल्यामुळे ह्या मार्गावर शाळा कॉलेजेस असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अंधारामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याआधीही या मार्गावर अपघात झालेले असताना संबंधित विभागाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.

हायमास दिव्यांवर लाखो रुपये खर्च करूनही ते न वापरता ठेवण्यात आले असून यामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत आहे. जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सर्व हायमास दिवे त्वरित सुरू करावेत, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.