Ticker

6/recent/ticker-posts

🌸 गाव पुरळ कलंबई येथे शिवजयंती जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा 🌸



🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के 🌸

 श्री काळकाई देवी क्रिकेट मंडळ, कलंबई येथील स्थानिक ग्रामस्थांनी शिवजयंती उत्सव हा थाटामाटा साजरा केला. तेव्हा शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले. कळंबई ते किल्ले विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. अनेक स्थानिक ग्रामस्थांनी व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हीराहिरीने या मिरवणुकीत भाग घेतला. त्याचप्रमाणे सकाळी नऊ वाजता मूर्तीचा अभिषेक सुद्धा करण्यात आला महाराजांची आरती घेण्यात आली त्याचप्रमाणे काळ काई  देवी ढोल पथक ठेवण्यात आलेले होते. तीर्थप्रसादा प्रसादाचा लाभ सुद्धा ठेवण्यात आला होता. प्रमाणे गावातील स्थानिक भजने हा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ हा सुद्धा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी महिला पुरुष ढोल पथक गाव,   गिर्या यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. रात्री नऊ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना सौ. सौराली नाटेकर , श्री भैरवी देवी. महिला भजन मंडळ मोंड गावठणवाडी यांच्या विरुद्ध , सौ ऋतुजा प्रशांत सावंत, श्री मालवीर भूतनाथ गजानन महिला भजन मंडळ यांचे महिला बुवांचे भजन ठेवण्यात आलेले होते. असे हे शिवजयंती निमित्त स्थानिक ग्रामस्थानाने व तेथील मंडळांनी शिवजयंती निमित्त कार्यक्रम आखलेले होते. तसेच किल्ले विजयदुर्ग येथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे गाव पडेल कॅन्टीन येते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन करून त्यांची पूजा अर्चा करून अनेक कार्यक्रम तेथे ठेवण्यात आले. असा हा शिवजयंतीचा उत्साह देवगड तालुक्यातील गावातील लोकांनी वाडी वाडीत तेथील स्थानिक ग्रामस्थानाने व मंडळाने, शिस्तबद्ध  उत्साहात  थाटामाटात साजरा केला. अशा या श्री राजे शिवछत्रपती महाराज यांना अनेक शिवभक्तांचे कोटी कोटी प्रणाम  🌸