Ticker

6/recent/ticker-posts

आज खळेगाव येथे थाटामाठात शिवजयंती साजरी .



 ता. प्रतिनिधी - 

लोणार तालुक्यातील खळेगाव येथे आज दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

सकाळी ७ :०० वाजता गावाकऱ्यांच्या उपास्थितीत सरपंच मधुकर सानप, पो.पा. दिलीप वायाळ व प्रशांत सानप, यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.

लहान व मोठ्या मुलामुलींनी लेझीमनृत्य सादर केले तसेच गावात टाळमृदंगाच्या गजरात थाटामाठात मिरवणूक काढली मिरवणुकीत गावातील सर्वधर्मीय महिला -पुरुष, लहान मोठी मुले यांनी जयघोष करत जल्लोषात मिरवणूक पार पडली.

रात्री ८:०० वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चे वंशज प्रा.ज्ञानेश्वर राजे जाधव यांचे व्याख्यान झाले.

कार्यक्रमास पोलीस पाटील, सरपंच, आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य, वयोवृद्ध व सर्व वयोगटातील महिला पुरुष उपस्थित होते.