येणेगुर (प्रतिनिधी):
येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना मातृ भाषेची गोडी लावणाऱ्या मराठी शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
प्रतिमा पूजन कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. शिक्षकांचा सत्कार मराठी भाषेच्या अध्यापनात योगदान देणाऱ्या चंद्रकांत बिराजदार गुरुजी,व तानाजी मदने गुरुजी या दोन्ही शिक्षकांचा मावळा प्रतिष्ठान विश्वनाथ स्वामी व जगदीश बिराजदार , मंगेश बरबडे व सोमनाथ बिराजदार ग्रामपंचायत कर्मचारी सचिन दुधभाते, विजय घंटे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले आणि मराठी भाषेच्या महत्त्वावर भाषणे दिली.
प्रमुख मार्गदर्शन यावेळी बोलताना मुख्याध्यापकांनी सांगितले की, मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे. तिचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश हरके गुरुजी, देवराज बिराजदार गुरुजी,शंकर हुळमजगे गुरुजी, अविनाश दुणगे गुरुजी,व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी प्रणिता कलशेट्टी व आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थिनी अश्विनी हुळमजगे या विद्यार्थिनी नी केले





Social Plugin