Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा .

 

अंभई: ग्रामीण प्रतिनिधी- दत्ता पवार 

जग्दगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आज दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.या दोन दिवसीय सोहळ्यात दिनांक २७ फेब्रुवारी रोजी साधक दिक्षा तर २८ फेब्रुवारी रोजी उपासक दिक्षा संपन्न होणार आहे.

सोहळ्यात आध्यात्म विज्ञान आणि व्यव्हार या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मानवी जिवनातील विविध समस्या कशा सोडविता येतील याबाबत जग्दगुरश्री मार्गदर्शन अरणार असून उपस्थितांना त्यांच्या दर्शनाचा लाभही घेता येणार आहे भक्तांच्या सोयीसाठी कार्यक्रम स्थळी भव्य मंडप, आसनव्यवस्था व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक उत्तर उपपिठाच्या वतीने करण्यात आले आहे.