ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील आदमपूर, गळेगांव,थडीसावळी,ता.बिलोली परिसरात बहरात आलेल्या हरभरा पिकांवर करपा रोग पसरल्याचे सद्यस्थितीत चिञ आहे. काही प्रमाणात दमट वातावरण निर्माण झाल्याने चहूकडे धुके पडलेले होते.त्याचाही परिणाम हरभरा पिकावर सर्वञ दिसून येत आहे.शेतकर्यांकडून आता हरभरा पिकावर अंतिम फवारणी शेतकरी करताना दिसून येत आहेत.
पहिला,दुसरा,तीसरा फुलांचा बहार हरभऱ्यास बसलेला आहे.घाटी हरभऱ्यास लगडल्याने शेतकरी आनंदात असताना ही समस्या आ वासून शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.परंतु ऐन बहरात असताना धुके किंवा अंतर्गत बुरशीजन्य रोगाने हरभरा करपून जात असल्याने,शेतकरीवर्गांत काहीशी निराशा पसरलेली दिसून आली.आधि पेरणी झालेल्या हरभऱ्यास घाटी लगडलेली आहे,तर मागून पेरणी केलेल्या हरभऱ्यास फुलांचा बहार आलेला आहे. आदमपूर,गळेगांव,थडीसावळी परिसरातील काही शेती पट्टय़ात हा रोग आढळून येत आहे.
जोमदार आलेले पीक शेत शिवारात काही भागात जागोजागी करपून पिवळे झाल्याने शेतकरी उपाययोजना करण्यात हतबल होताना दिसून येत आहेत.अनेक समस्यांवर उपाय करीत,पिकांचे संवर्धन करीत शेतकरीवर्ग नियमित तगताना,जगताना या हरभरा उधळण्याच्या समस्येने सद्यस्थितीत चिंतेने ग्रासल्याचे चिञ आहे.





Social Plugin