प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड:- स्थानिक स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड यांनी याप्रसंगी बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी सुरू केले. ब्रिटिश काळात समाजात समाज प्रबोधन करणे, हे महत्त्वाचे व जबाबदारीचे होते. तेच काम बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण' या वृत्तपत्रातून केले. स्वदेश चळवळ आणि सामाजिक आत्मभान त्यांनी या माध्यमातून जागृत केला. म्हणून महाराष्ट्र शासनाने हा दिवस पत्रकार दिवस म्हणून, साजरा करण्याचे आव्हान केले आहे. हाच वसा व वारसा लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी भावी पत्रकारांनी यांचा आदर्श घ्यावा असे आवर्जून मनोगतात व्यक्त केले. हाचं आदर्श घेऊन भावी लोकशाहीचे रक्षण व संवर्धन करावे असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचलन डॉ. केशव कोकाटे यांनी केले. आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रकाश हनवते यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.





Social Plugin