प्रतिनिधी @समाधान भुतेकर
स्थानिक सहकार विद्या मंदिर दे. माही येथील विद्यार्थी जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये गाईड विभागातून ग्रामीण भागातून मुलींनी प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल त्याच्या स्वागतासाठी संस्थापक अद्यक्ष राधेशामजी चांडक (भाईजी)सहकार विद्या मंदिर दे. माही येथे उपस्थित होते. तेव्हा विद्यार्थी सत्कार प्रसंगी भाईजी बोलत होते. पुढे बोलताना भाईजी यांनी मुलांना खेळाचे महत्व सांगत खेळा मध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास साधावा असे ते म्हणाले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर, बुलडाणा अर्बन बॅंकचे व्यवस्थापक देशमाने साहेब, श्री खेडेकर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते तर या स्काऊट गाईड विदयार्थ्यांचे मार्गदर्शन म्हणून लाभलेले स्काऊटर श्री भुतेकर सर व गाईडर सौं सारिका मॅडम याचं विशेष कौतुक भाईजीने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव तळेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राहुल शेळके सर यांनी केले.





Social Plugin