Ticker

6/recent/ticker-posts

गेवराई येथे संत गजानन महाराज मंदिरात 'श्रीं'चा प्रकट दिन उत्साहात साजरा

 

मारोती गाडगे/गेवराई 

     संत गजानन महाराज की जय,गण गण गणात बोते च्या जय घोषात शहरातील संत गजानन महाराज मंदिरात रविवार दि.८ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्याचबरोबर शेकडो भाविकांनी 'श्रीं'चे दर्शन घेवुन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संत गजानन महाराज सेवा समितीचे सदस्य व भक्तगण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र शेगांव येथील संत गजानन महाराजांचा रविवार दि.८ फेब्रुवारी रोजी प्रकट दिन असल्याने शहरातील संत गजानन महाराज मंदिरात सकाळी  ८ वाजता अभिषेक होवून दुपारी १२ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती होवुन शेकडो भावीक भक्तांनी संत श्री गजानन महाराज की जय,गण गण गणात बोते च्या जयघोषात 'श्रीं'चे दर्शन घेवुन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संत गजानन महाराज सेवा समितीच्या सदस्यांसह भक्तगण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.