हिवरा बु. ता. .
मानोरा येथील 'जय भवानी गोशाला' कडून महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गावातील महादेव मंदिरावर साबुदाणा उसळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. धार्मिक वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. गोशाळेकडून राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी गोशाळेचे अध्यक्ष-विजय तुळजापुरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक सतीश गावंडे, नारायण पाटील, बबु इंगळे, गोपाल श्रावणे, छोटू रोहनकार, संदीप भिमटे, मंगेश नांदेकर, गोपाल शिंदे, अमर येवले, घनश्याम राठोड, शिवा अंधारे, दिनेश ठोंबे, प्रदीप भिमटे, राम जाधव, कृष्णा भिमटे, भीमराव जाधव, शशिकांत गावंडे इत्यादी गावकरी मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





Social Plugin