Ticker

6/recent/ticker-posts

युवा सरपंच रहेरबर इनामदार सार्वजनिक स्मशानभूमी विकास कामासाठी सरसावले.



राजेश आमेटवार  ग्रामीण प्रतिनिधी बिलोली 

बिलोली : तालुक्यातील हिप्परगा थडी ग्रामपंचायतीचा नाव सदैव कोणत्या न कोणत्यातरी विकास कामाबद्दल सदैव चर्चित असतो. त्याचे कारण इनामदार हे एक उच्चशिक्षित असून त्यांनी परदेशातील इंजिनिअरिंगची नोकरी सोडून गावातील विकासाबद्दल विचार करून वैयक्तिक जीवनाचा विचार न करता पहिले गाव नंतर घर हे मनात ठाम धरून त्यांनी परदेशातील लाखो रुपयांचे नोकरी सोडून मनात कुठलाही स्वार्थ न बाळगता निवडणूक लढवली. त्यांची गावाबद्दल असलेली तळमळ पाहून गावकरी त्यांना विजयी पण केले. त्यांनी सरपंच होताच गावचा कायापालट करून टाकले गावातील एकही व्यक्ती हा कुठल्याही योजना पासून दूर न राहायला पाहिजे याकडे बारकाईने लक्ष देऊन निःस्वार्थ पणे काम करतात. 

अशातच कुंभार,न्हावी, धोबी व भोई समाजासाठी एकत्रित असलेली स्मशानभूमी च्या काही प्रश्नासाठी त्यांनी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नायगाव येथे झालेल्या काँग्रेस कमिटी च्या सभेच्या बैठकीत उपस्थित राहून त्यांनी गावातील ओबीसी व धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती असून सदर समाजासाठी असलेल्या स्मशानभूमी मध्ये संरक्षण भिंत,शेड, पाणी ची व्यवस्था व प्रवेश रस्ता याांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे पावसाळा व रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यासाठी खासदार स्थानिक विकास निधी (MPLADS) नियमानुसार पात्र असनू, ग्रामपंचायतच्या ठरावाने सकारात्मक दृष्ट्या अत्यावश्यक असलेल्या या कामाांसाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहेत. त्यावर खासदार साहेबांनी हि सकारात्मक भूमिका दाखवली.

गावात सार्वजनिक बाथरूम,कचराकुंडी, तसेच भक्ती स्थळांकडे जाण्यासाठी रस्ते, पाण्याचे प्रश्न आणि गावातील विकास कामासाठी सदैव कार्यशील दिसून येतात त्यांच्या या कार्यामुळे गावातील नागरिक आनंदी दिसून येतात.गावातील उच्चशिक्षित युवा सरपंचामुळे येणाऱ्या काही वर्षात गावचा चेहरा मोहरा बदलेल आणि एक आदर्श गाव होईल आणि आमच्या गावचे सरपंच इनामदार यांनी आमच्या गावाची कायापालट करून विकसित गाव बनवतील असे आनंदाचे वातावरण गावकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.