Ticker

6/recent/ticker-posts

कन्‍नड तालुक्यातील भोकनगाव येथिल संस्कारक्षम विद्यार्थी झाले मातृ-पितृ चरणी नतमस्तक झाले.




यशवंत पवार कन्नड 

         छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोकनगाव येथे “संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे” या उपक्रमाअंतर्गत मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख श्रीमती जालना पुरकर मॅडम उपस्थित होत्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे यथोचित पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तर पालकांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान स्पष्ट दिसत होते.

     यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्व शिक्षकांचे ही पूजन केले. या प्रसंगी सर्व वातावरण अगदी भावनिक झाले होते.

         या संस्कारक्षम उपक्रमासाठी  सहकार्य व मार्गदर्शन श्रीमती मनिषा पाटील, श्री. योगेश पवार, श्री. आशिष दापके, श्री. मुकुंद निकम तसेच श्री. गोकुळ निंबाळकर यांनीकेले व  मोलाचे योगदान दिले.

     या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता, आदर आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर जीवनमूल्यांची जपणूक करणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

हा मातृ-पितृ पूजन कार्यक्रम उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मनात दीर्घकाळ भावनिक आठवण म्हणून कोरला गेला. 

         अत्यंत हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सर्व उपस्थित माता पालकांनी  शिक्षकांचे आभार मानले.