Ticker

6/recent/ticker-posts

डॉ विशाल हणवते यांचा बाभूळगाव येथे सत्कार समारंभ संपन्न.



प्रतिनिधी : प्रा विजय गायकवाड

हिंगोली: येथील बाभूळगाव येथे सुजाता महिला मंडळ, रमाबाई महिला मंडळ व समस्त गावकरी यांच्यातर्फे डॉ. विशाल उत्तमराव हनवते यांनी (M.D.) ही पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अगस्ती हनवते होते. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. उत्तमराव हनवते यांनी आपण सर्व जिव्हाळ्याचे, जीवाभावाचे लोक एकत्र येऊन आमच्या कुटुंबाचा जो सन्मान सत्कार केला त्याबद्दल गावकऱ्यांच्या आभारी आहे. डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये पुढील पिढ्यांनी हा वारसा जोपासावा अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉक्टर विशाल यांनी मला मिळालेल्या यशातून गावातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन गावाचे नाव अजून मोठे करावे असे मत व्यक्त केली. प्रा. डॉ. प्रकाश यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आमच्या आजी-आजोबा आणि आई-वडिलांनी जे कष्ट केले. आम्हाला शिकविले त्यांच्या कष्टाचा हा परिणाम आहे त्यामुळेच आम्ही उच्चविद्या विभूषित होऊ शकलो. बाभूळगावला गुणवंतांचा वारसा लाभला आहे. येथील लोक कष्टकरी आहेत. पंचक्रोशीत गावाचे नाव नोकरदारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही या गावचे आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास हनवते यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुरेश हनवते यांनी केले. कार्यक्रमाला गावचे सरपंच केतुल हनवते, गुलाब हनवते, उद्धव हनवते, प्रकाश हनवते हे उपस्थित होते. भगवान हनवते,रवी हनवते,लक्ष्मीबाई गायकवाड,सयाबाई जावळे,कांताबाई हनवते,सुंदराबाई भिसे, तुळसाबाई हनवते,गयाबाई हनवते, आम्रपाली हनवते,शोभाबाई हनवते, मंगलबाई हनवते,भारतबाई सारूखे व सविता हनवते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी बाभूळगावातील गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.