प्रविण भोलाने,ग्रामीण प्रतिनिधी
23 फेब्रुवारी, सिल्लोड
येथील मोरया अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. सिल्लोड या संस्थेने आपल्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोणताही वायफळ खर्च न करता एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा आदर्श उपक्रम राबविला आहे. संस्थेचे कर्जदार सभासद स्व. विवेक रेवनाथ जेठे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगी संस्थेने मदतीचा हात पुढे करत त्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांचा विमा दाव्याचा चेक सुपूर्द केला.
*विमा संरक्षणातून कुटुंबाला आधार*
संस्थेच्या वतीने कर्जदार सभासदांचा विमा उतरवण्यात येतो. IFFCO-TOKIO या इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने हे विमा संरक्षण प्रदान केले जाते. विवेक जेठे यांच्या निधनानंतर संस्थेने तातडीने पाठपुरावा करून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून आणली. वर्धापन दिनाचे अनावश्यक कार्यक्रम रद्द करून हा निधी वारसांना सुपूर्द करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
*प्रमुख उपस्थिती*
वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री. रतन खंडू जाधव आणि IFFCO-TOKIO कंपनीचे व्यवस्थापक श्री. सुरेश इवरे सर यांच्या हस्ते मयत सभासदाच्या वारसदारांना ५ लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला.
*याप्रसंगी उपस्थित मान्यवर:*
श्री. संजय गोविंद वीर (व्यवस्थापक)
श्री. गोपाल जाधव (रोखपाल)
श्री. प्रमोद काळे (लिपिक)
श्री. केशवभाऊ जाधव व श्री. दीपक साबळे (पिग्मी प्रतिनिधी)
*"सभासदांच्या अडीअडचणीत खंबीरपणे उभे राहणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे. वर्धापन दिनाचा खर्च टाळून एका गरजू कुटुंबाला मदत करताना आम्हाला समाधान वाटत आहे."*
— *श्री. रतन खंडू जाधव (चेअरमन, मोरया अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी)*
या उपक्रमाचे सिल्लोड परिसरातून मोठे कौतुक होत असून, सहकार क्षेत्रातील इतर संस्थांसाठी मोरया अर्बनने एक नवीन आदर्श घालून दिला आहे.






Social Plugin