यशवंत पवार कन्नड
दिनांक 15/02/2026 रोजी कन्नड शहरातील शिवनगर येथील पौराणिक व ऐतिहासिक लिंगेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त एक अनोखा सामाजिक संगम पाहायला मिळाला. या प्रसंगी हिंदू–मुस्लिम एकतेचे सुंदर दर्शन घडले.
कन्नड शहरातील भाजपा नेते उद्योजक मनोज भाऊ पवार हे लिंगेश्वर महादेव मंदिरात पूजा-अर्चनेसाठी गेले असता, कन्नड शहराच्या काँग्रेस नेते तथा नगराध्यक्षांचे पती व नगरसेवक अब्दुल जावेद शेठ यांनीही मंदिरास भेट देऊन महादेवांच्या पूजेचा महिमा जाणून घेतला. विशेष म्हणजे नगराध्यक्षांच्या वतीने मागील दोन दिवसांपासून मंदिर परिसर व आजूबाजूच्या भागाची स्वच्छता करून घेण्यात आली. गेल्या 15 वर्षापासून कोणत्याही हिंदू नगराध्यक्षांना हे जमले नाही जे आज एक मुस्लिम नगराध्यक्षांनी लंगोटे महादेव मंदिर यांची पूर्ण परिसर स्वच्छ केले. झालेल्या या कामाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मनोज भाऊ पवार व अब्दुल जावेद शेठ यांनी संयुक्तरित्या शिवभक्तांना फराळाचे वाटप केले. महाशिवरात्रीच्या या पवित्र निमित्ताने भाजपा व काँग्रेसशी संबंधित नेते एकत्र येऊन सेवा करताना दिसले, जे निस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक ठरले. याप्रसंगी मंदिर समिती सदस्य व शिवभक्तांच्या वतीने मनोज भाऊ पवार व जावेद शेठ यांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवर उपस्थिती
गिरी बाबा, दाभाडे साहेब, मनिष सेठी, संजीव माळी साहेब, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन ठाकूर, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इम्रान भाई शेख, शंकर राऊत, आदित्य देशमुख, राजु भाई ,अजय सातदिवे,, लखन पवार, ओमकार बोदक, सागर दरोडे, गोविंदा गवळी, प्रवीण हाडोळे, शिबिराज नरवडे, सोनू धिवर, सतीश गायकवाड, स्वप्नील चव्हाण, आकाश राठोड, प्रदीप केवट, गुड्डू जाधव, टोम्पे नाना, मुन्ना दाभाडे, प्रमोद खरे, गोकुळ राठोड, महेश राठोड, शुभम राठोड, गणेश पवार, करण पवार, गांगुर्डे सर, शेखर शिंदे, रवी दाभाडे, विलास गोरे, राजू कमिटी शेख, कल्याण पाटील, उदय सोनवणे, यश गायकवाड, सुनील अग्रवाल, बाळू बनकर, गुड्डू बनकर, गणेश शिरसाट, दीपक डोळस, अरुण मासरे, सचिन मोरे, अपूर्व जोशी आदींसह मनोज पवार मित्र मंडळाने कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला भाविक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने घडलेला हा एकतेचा आणि सेवाभावाचा संदेश देणारा संगम कन्नड शहरासाठी प्रेरणादायी ठरला.





Social Plugin