Ticker

6/recent/ticker-posts

" हर हर बोला हर हर महादेव'चा झाला गजर"



सतीश पांडे [ कळमेश्वर प्रतिनिधी ]

कळमेश्वर : तालुक्यातील लोणारान जीकच्या जंगलातील टेकडीवरील गुहेतील शिरजोरी बाबा हे प्रसिद्ध देवस्थान असून, महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांचे 'हर हर बोला हर हर महादेव'चे स्वर दुमदमले आहेत. शिरजोरी बाबा देवस्थान अगदी पुरातन आहे. याठिकाणी भोसलेकालीन बाहुली विहीर आदी पुरातन ठेवा आहे. ही टेकडी मोठ्या दगडांची बनली असून, दगडांना कुठलाच आधार नाही. पुरेशा जागेअभावी भाविकांची गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते, असे चित्र आहे.

हे तीर्थक्षेत्र 'क' वर्गात निवडले असून, शासनाच्या माध्यमातून येथे विकास होणे महत्त्वाचे आहे. परंतु, हा परिसर वनक्षेत्रात येत असल्याने येथे आजपर्यंत कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. लोणारा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोणारा येथून दीड किमी. तसेच उपरवाही मार्गेसुद्धा दोन किमी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, हा मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. यापुढील रस्ता अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे यात्रेदरम्यान अवकाळी पाऊस आल्यास नागरिकांची वाहने मातीत रुततात. तसेच येथे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक कुपनलिका करण्यात आली होती. त्यातही मातीमिश्रित पाणी येत असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे.

ही यात्रा येथील निसर्गरम्य वातावरणामुळे जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. या परिसरातील नाले, विविध जातीचे वृक्ष, मोठमोठे दगड, सभोवताली असलेल्या टेकड्या, शिरजोरी बाबा यात्रेच्या टेकडीवरून वेणा प्रकल्पाचे दिसणारे लोणारा नजीकच्या जंगलातील शिरजोरी बाबा देवस्थान येथे यात्रा भरत असते.

विहंगम दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेतात. महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हे देवस्थान वनक्षेत्रात असून, येथे वाघ, बिबटसारख्या हिंस्त्र पशुंचा वावर आहे. यात्रेतील गर्दीमुळे वन क्षेत्रात आग लागणे किंवा वन्यजीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यात्रेच्या दिवशी सायंकाळी ५:३० वाजता यात्रा संपविण्यात येईल व त्यानंतर कोणालाही वन क्षेत्रात प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.