बिलोली प्रतिनिधी राजेश आमेटवार
बिलोली - तालुक्यातील बहुचर्चीत असलेल्या सगरोळी येथील मांजरा नदी पात्रातील लाल रेती राज्यात नव्हे तर परराज्यात सुद्धा पसंदी वाढली आहे.येथील सद्यस्थितीत चालू असलेल्या शासनाच्या धोरणनुसार ई -टेंडर होऊन रेती घाट सुटला आहे मात्र असे असून सुद्धा या घाटावरुन अवैध वाळू विना परवाना वाहतूक करत असल्याने शासनाच्या महसूल ला चुना लावणाऱ्या माफीयांच्या विरोधात
महसूल विभागाने कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. मग त्यासाठी महसूल प्रशासन दि १३ रोजी दुपारी सुमारे १;३० च्या सुमारास मौजे खतगाव येथुन गाडी वाहन क्र. एम.एच.१४ जी. यु ६६७५ ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे मंडळ अधिकारी एन. जी कानगुले यांना निदर्शनास आले मग त्यांनी गाडी थांबवून चालकाकडे चौकशी केली असता गौन खनिज परवानगी आढळून आली नसल्याने पुढील कार्यवाही करिता वाहन तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या आदेशावरून व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदमपूर महसूल मंडळ अधिकारी एन.जी कानगुले, तलाठी नागनाथ बोधले, रमेश गड्डापोड, मिलिंद सुपेकर यांनी अवैद्यरित्या वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असल्याने रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत या कारवाईमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळ्यांना चाप बसला असून, नागरिकांमधून महसूल प्रशासनाचे कौतुकही होत आहे तिन दिवसात दुसरी कार्यवाही झाल्याने अवैध रेती माफीया चांगलेच संतापले होते. मग हे वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.मंडळ अधिकारी कानगुले आणि तलाठी नागनाथ बोधले यांच्या या धडक कारवाही मुळे विना परवाना आणि ओव्हर लोड वाहतूक करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाले आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी जड वाहने भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या वाहणावरच प्रशासनाने कारवाही करण्याचा रपाटा लावला आहे. राजकीय व्यक्तींच्या वाहणावर दुर्लक्ष करत आहेत. त्यावर देखील कार्यवाही करण्याची धमक प्रशासनाने दाखवावी - सतृंप्त वाहन चालक संघटना





Social Plugin