Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण समतोलसाठी माती पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे .प्रा.डॉ.अभिमान निमसे ......

 


छायाचित्र: पुसेगाव _ कला व वाणिज्य महाविद्यालयात जलसंधारण आणि मृदा संधारण व्यवस्थापन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.डाॅ.अभिमान निमसे, व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,प्रा.डॉ. संदीप किर्दत,, प्रा डॉ.जय चव्हाण,प्रा. श्रीमती मनुजा सोनार. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध 


 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे 

हवामान बदल, अनियमित पर्जन्यवृष्टी, वाढते प्रदूषण आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि मृदा व्यवस्थापन ही आजच्या काळाची अत्यंत गरज बनली आहे.असे प्रतिपादन प्रा.डाॅ.अभिमान निमसे यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात  भूगोल विभाग आणि अग्रणी महाविद्यालय अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. आर.पी.भोसले,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.संजय क्षीरसागर आणि.प्रा.डॉ.संदीप किर्दत, डॉ.जय.चव्हाण प्रा.श्रीमती एम.बी. सोनार इत्यादी उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात डॉ.निमसे म्हणाले,"विकासाच्या नावाखाली निसर्गाचा होणारा ऱ्हास मानवी जीवनावर थेट परिणाम करत असून याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक झाले आहे.गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, रासायनिक खतांचा अतिरेक, औद्योगिक प्रदूषण आणि अनियंत्रित शहरीकरणामुळे जमिनीची नैसर्गिक रचना बिघडत आहे. परिणामी मृदा धूप वाढत असून शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.अनेक भागांत जमिनीची पाणी धारण क्षमता कमी होत चालली आहे.ही चिंतेची बाब आहे. तसेच मृदा ही केवळ शेतीची आधारशिला नसून संपूर्ण पर्यावरणीय संतुलनाचा कणा आहे. सुपीक मृदा नष्ट झाली तर अन्नसुरक्षा, पाणी साठवण आणि जैवविविधता यांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे मृदा संवर्धनासाठी जलसंधारण, वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, समतल चर, बांधबंदिस्ती, कंपोस्ट खतांचा वापर अशा उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे.शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जात असल्या तरी लोकसहभागाशिवाय या प्रयत्नांना यश मिळणे कठीण आहे.शेतकरी, विद्यार्थी,स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेणे गरजेचआहे.शाळा-महाविद्यालयांतून पर्यावरण शिक्षण प्रभावीपणे दिले गेले, तर भावी पिढीत निसर्गाबद्दल जाणीव निर्माण होईल.

आज जागतिक पातळीवर ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना महत्त्वाची मानली जात आहे. विकास करताना निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे.आज मृदा व पर्यावरण वाचवले तरच उद्याचे भविष्य सुरक्षित राहील, ही जाणीव समाजाच्या प्रत्येक घटकात रुजविणे अत्यंत आवश्यक आहे.

पर्यावरण संवर्धन आणि मृदा व्यवस्थापन ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरली, तरच निसर्गाशी सुसंवाद साधत शाश्वत आणि समृद्ध भारत घडवणे शक्य होईल. असा आत्मविश्वास  व्यक्त केला. अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.पी. भोसले म्हणाले"पारंपारिक शेती पद्धत तिला आधुनिक संशोधनाची जोड मिळाल्यास उत्पादन वाढते जलसंधारण व मृत्यू संदर्भात शेतीविषयक तरुणांच्या मनामध्ये आवड निर्माण होत असताना दिसते आजच्या तरुण पिढीने शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे शेती क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी निर्माण होत आहेत पाण्याचा शाश्वत वापर करणारे ग्रामसमूह सर्व आपल्या पुढील पिढीसाठी आदर्श ठरतात याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.एच.जी.निमसे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.एस.आर. धोंगडे यांनी केले तर आभार प्रा.एस.एस.कोकरे यांनी मानले.