Ticker

6/recent/ticker-posts

पारोळा केंद्र समुह शिक्षण परिषदेत टाकावु पासुन टिकावु निर्मितीचा जागर .



गरज ही शोधाची जननी आहे व त्यातुनच नवनिर्मिती होते - विश्वासराव पाटील , गटशिक्षणाधिकारी

ज्ञानदिप पाटील प्रतिनिधी पारोळा


पारोळा : गरज हीच खरी शोधाची जननी आहे व त्यातुनच नवनिर्माण होते . विदयार्थ्यांमध्ये ज्ञानरचनावाद यासाठीच निर्माण केला पाहिजे . ते आपल्याला प्राप्त ज्ञानातुन स्वतःची अशी नवनिर्मिती करु शकतील की त्यांच्यासह समाजालाही त्याचा चांगला फायदा होईल . हेच खरे शिक्षकांच्या कामाचे उद्दिष्ट अपेक्षित आहे असे प्रतिपादन विश्वासराव पाटील , गट शिक्षणाधिकारी यांनी पारोळा केंद्र समुहाच्या जि प उच्च प्राथमिक शाळा क्र २ पारोळा येथे आयोजित पुष्प ७ व्या शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करतांना केले .

या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख रामकृष्ण बाविस्कर तर केंद्रातील जि प व खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते .सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले .शिक्षण परिषदेच्या आयोजनासह त्यांनी टाकावु वस्तु पासुन सदैव काहीतरी पुन्हा नवीन उपयोगी व टिकावु वस्तु निर्माण केली पाहिजे .आमच्या शाळेचा सदैव हा प्रयत्न असतो . तोच आम्ही विदयार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतो . दरवेळी नवनवीन वस्तु विकत घेण्यापेक्षा आपल्याकडे अगोदरच उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून त्यापासुन पुन्हा उपयोगाची वस्तु बनवावी . युज ॲण्ड थ्रो पेक्षा त्यातुन रिसायकल प्रमाणे नवनिर्मिती केली गेली पाहिजे . यामुळे पर्यावरण रक्षणाचेही ध्येय साध्य होईल असे सांगितले .

शाळेच्या विद्यार्थ्यांनी काही शैक्षणिक व काही सांस्कृतिक उत्कृष्ट असे उपक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली . त्यांना अनेक शिक्षक बांधवांची रोख बक्षिसे दिली . त्यात जि प शाळा क्र ३ पारोळा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सर्व ५० विद्यार्थ्यांना आकर्षक कंपास बॉक्स भेट देवुन त्यांचा आनंद द्विगुणित केला .

मंगला शिवदे व मोहन बागुल यांनी अध्ययन निष्पत्ती व मासिक नियोजन बाबत मार्गदर्शन केले . यावर गटकार्य घेण्यात आले . स्मिता साळुंखे व किशोर पाटील यांनी  अध्यापन साहित्य व प्रश्न निर्मिती यावर अभ्यापुर्ण मत मांडले व त्यांनी केलेले कार्य सादर केले . मयुरी पाटील व मंगला पाटील यांनी माझा वर्ग माझे नियोजन व इ ३ री अध्ययन निष्पत्ती बाबत मार्गदर्शन केले .

या प्रसंगी रामकृष्ण बाविस्कर यांनी लक्षणिय ठळक बाबींचा आढावा , प्रशासकिय विषय व त्याबाबत माहिती , विदयांजली २.० नोंदणी व त्यात वेळोवेळी माहिती भरण्याबाबत सूचना केल्या . अपार आयडी व आधार कार्ड काम पुर्ण करणे , इ १ ली दाखलपात्र विद्यार्थी शोधुन त्यांना शाळेत दाखल करून पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचेही आवाहन केले .

शाळेच्या विदयार्थ्यांनी सुंदर असे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सादर केले हे बघुन त्यांनी विद्यार्थी गुणवत्ता व शिक्षक घेत असलेले परिश्रम बघुन समाधान वाटते असे मत व्यक्त केले .

शितल पाटील यांनी अतिशय सुंदर काव्यत्मक व विविध दाखले देत सुंदर असे सुत्रसंचलन केले . मोहन बागुल यांनी आभार प्रदर्शन केले .