
भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड युथ फाऊंडेशनची वर्ष २०२६ करिता नवीन कार्यकारिणीची घोषणा व पदग्रहण सोहळा व सत्कार समारंभ बुधवार दि.११ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता स्थानिक बलसोना लॉन उमरेड येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या गरिमामय कार्यक्रमास प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी संजय भेंडे,प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी राजेंद्र मुळक विशेष अतिथी म्हणून उमरेड नगरीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता कारू त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहिकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,पूर्वाध्यक्ष
संजय मौदेकर,कैलास लारोकर,राजेश जिकार,दीपक पटले, सचिव गौरव राहाटे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीची घोषणा व पदग्रहण व उमरेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत विजयी
नगराध्यक्षा व सर्व तीस नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडला
नूतन कार्यकारिणीची घोषणा व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक मा. अनिलकुमार गोविंदांनी यांनी केली.
अध्यक्ष - मनीष बालपांडे
सचिव - समर भगत
उपाध्यक्ष- रोशन पोकळे, स्वप्नील लाडेकर, रितेश राऊत, विलास रायपूरकर,
कोषाध्यक्ष - सतीश चकोले
जनसंपर्क अधिकारी- संजय चाचरकर
सहसचिव- नरेंद्र बालपांडे ,हितेश गडबोरीकर
सह कोषाध्यक्ष- पवन मडावी
सह जनसंपर्क किशोर आदमने
कार्यकारिणी सदस्य- विजय जयस्वानी,सतीश तांबेकर, गौरव राहाटे,प्रांजल डहाके ,शुभम सिर्सिकर,सौरभ भिवगडे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील लाडेकर यांनी केला. तत्कालीन अध्यक्ष दीपक पटले यांनी मागील दोन वर्षात पार पडलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला व आपले मनोगत व्यक्त करून नवीन अध्यक्षांना पदभार सोपविला. संयोजक सचिन कुहिकर यांनी वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्य केलेल्या सदस्यांची घोषणा व तत्कालीन अध्यक्ष ,सचिव यांचा गौरव उमरेड युथ फाउंडेशन चे वतीने केला तर संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार यांनी सर्व निवर्तमान अध्यक्षांचा व सचिव यांचे यशोगाथा सर्वांसमक्ष मांडली. तर *नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष बालपांडे* यांनी स्वीकृती भाषण सादर करून अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली.आभार सचिव समर भगत यांनी मानले.
सदर कार्यक्रमास शहरातील गणमान्य ज्येष्ठ व्यक्ती माजी आमदार सुधीर पारवे,माजी नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, सेवानिवृत मुख्याध्यापक कृष्णकुमार मिश्रा,,पब्लिक हायस्कूल चे मुख्यध्यापक माधव कुसराम , उमरेड युथ फाऊंडेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी व समस्त सदस्यगण सहपरिवार उपस्थित होते.यशस्वितेसाठी श्रीकांत बोरकर, आशिष वंजारी, स्वप्नील गवळी, राकेश जमखंडे, विशाल बावणे, जय मूलचंदानी,दिनेश ढेबूदास,स्वप्नील ब्रम्हे विजय रामटेकर,विक्रांत वरघणे,सचिन जोधे,अजय कावळे,सूरज राहाटे,नितेश वैद्य,उज्वल चिंदमवार इत्यादीचे सहकार्य लाभले.




Social Plugin