Ticker

6/recent/ticker-posts

हिप्परगा थडी येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी

राजेश आमेटवार ग्रामीण प्रतिनिधी : बिलोली

बिलोली - हिप्परगा थडी येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका येथे छत्रपती शिवरायांची जयंती मोठया थाटामाटात करण्यात आली.सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेजवळ दीप प्रज्वल करून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर शिवरायांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या बुद्धिमत्ता चाचणी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. पुढे लहान चिमुकले भाषण केले.महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाते.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका मराठा कुटुंबात झाला. काही जण त्यांचा जन्म १६२७ झाला असे मानतात. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते.

शिवाजी महाराज हे शहाजी महाराज आणि जिजाबाई यांचे पुत्र होते. त्यांचे जन्म शिवनेरी किल्लावर झाला आहे.अश्या प्रकारे हिप्परगा थडी येथील लो.अण्णाभाऊ साठे वाचनालयातील लहान चिमुकले आपल्या ओबडधोबड वाणीतून महाराजांचा इतिहास भाषणातून सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. सरपंच प्रतिनिधी साहेबराव अंजनिकर, भगवान एडकेवार, प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील शंकरआप्पा मठपती, अभ्यासाबद्दल आवड असलेले तसेच संपूर्ण आयुष्य शैक्षणिक क्षेत्रात वाहून देणारे आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य मंजुळाबाई हायस्कूल खतगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक कौठकर सर, ग्रामपंचायत सदस्य शेख गौस, वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार, ग्रंथपाल राजू अंजनीकर, सचिव राजू भुमाजी अंजनिकर, गावचे प्रतिष्ठित नागरिक अहेमद इनामदार,बालाजी एडकेवार, मरीबा गायकवाड, जक्कोजी एडकेवार, राजू एडकेवार, सुनील अंजनीकर,अविनाश लघुळकर, निळकंठ अंजनिकर, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.चिमुकले मुले महाराजाबद्दल त्यांच्या जीवनातील झालेल्या प्रसंगाबद्दल भाषणे केले.हा जयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदमय, उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला असून महाराजा बद्दल त्यांच्या मनातील आदर विद्यार्थ्यांनी भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ अंजनीकर यांनी अतिशय सरळ सोप्या भाषेत आणि आपल्या सुस्पष्ट अश्या वाणीतून केले आणि शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव अंजनिकर यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रावरील झालेल्या प्रसंगाबद्दल इतिहास सांगत महाराजांना देखील आपल्याच लोकांनी किती त्रास दिला आणि या सर्व संकटांना मात करून शेवटी शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.कारण त्यांची आई माता जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच शौर्याचे धडे गिरवीत होते हे सर्व सांगून अध्यक्षांनी कार्यक्रमाची सांगता केली.सर्व चिमुकले मुले, गावकरी मंडळी या शिवजयंतीला सहभागी झाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहेबराव अंजनिकर सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असा जाहीर करत अश्याच महापुरुषांच्या जीवनातील त्यांनी घडविलेले इतिहास वाचावे असे बोलत शेवटी कार्यक्रमाचे सांगता झाली असे सांगून सर्वांचे आभार मानले.