मन्सूर शहा चिखली.:-- (जि. बुलडाणा) :
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी प्रबोधन कार्यशाळा’ शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायं. ५.०० या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नोंदणी सकाळी ९.०० वाजता होणार आहे.
या कार्यशाळेत शेतमालावर आधारित उद्योग उभारणीच्या संधी, मूल्य संवर्धन, प्रक्रिया उद्योग, पॅकिंग-लेबलिंग, गुणवत्ता मानके, ब्रँडिंग व मार्केटिंग, शासकीय योजना व अनुदान, कर्ज/प्रकल्प अहवाल तसेच विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख हे राहणार असून उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डावरे आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
प्रथम सत्रात ‘शेतमाल प्रक्रिया उद्योग संधी’ या विषयावर कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषतज्ञ कु. कृतिका गांगडे मार्गदर्शन करणार आहेत. द्वितीय सत्रात अन्न सुरक्षा, गुणवत्ता मानके व परवाने या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील व्याख्यान देतील. तृतीय सत्रात प्रक्रिया उद्योगासाठी शासकीय योजना व आर्थिक सहाय्य यावर नाबार्ड, कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभणार आहे.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य भैय्यासाहेब मेटकर व आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित राहतील. तहसीलदार विजय सवडे व तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या कार्यशाळेस नाबार्ड, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, चिखली यांचे सहकार्य लाभले आहे.
कार्यशाळा प्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे तर समन्वयक म्हणून डॉ. गणेश मालटे कार्यरत आहेत. शेतकरी, उद्योजक व इच्छुक नागरिकांनी या प्रबोधन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.png)




Social Plugin