प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सरळसेवा भरती प्रक्रियेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षांसाठी सन २०२३, २०२४ व २०२५ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे वयामध्ये ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत सरसकट सर्वांना शिथिलता मिळण्याबाबत...
संदर्भ :-
१) कमाल वयोमर्यादा दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शिथिलता देणेबाबत, शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र. १४/कार्या १२ दि. ३ मार्च २०२३.
२) कमाल वयोमर्यादा शिथिलता देणेबाबत, शासन निर्णय क्र. एसआरव्ही २०२४/प्र.क्र.३९/का. १२ (सेवा) दि. २० डिसेंबर २०२४.
विशेष बाब :-
खालील निवेदन प्रमाणे काढण्यात येणारा शासन निर्णय १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करण्यात यावा. तसेच राज्यसेवा जाहिरात २०२४ व संयुक्त गट-१ जाहिरात २०२५ या परिक्षेस बसण्यास आम्हाला संधी देण्यात यावी.
कारण
१)सन २०२५-२६ मध्ये शासनाच्या धोरणानुसार ७५ हजार नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तसेच २०२६ व २०२७ मधील पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी.
२)तसेच २०२४ ला एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे व न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भातील निर्णयांमुळे आणि लोकसभा, विधानसभा निवडणूक आचार संहितेमुळे कोणतीही शासन भरती झालेली नाही. या कारणास्तव विद्यार्थी सलग दोन वर्षे पदभरतीला वंचीत राहिले आहेत.
३) २१ फेब्रुवारी २०२३ ला ९ हजार पदाची कंम्बाईन परिक्षा गट ब व क फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. परंतू त्यानंतर ३ मार्च २०२३ ला वय सवलतीचा शासन निर्णय लागू झाला. परंतू शासन व आयोगाकडे वारंवार मागणी करुन देखील विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची लिंक सुरु करुन न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना कंबाईन-२०२३ या परिक्षेला मुकावे लागले. २०२४ या वर्षी आयोगामार्फत कोणतीही परिक्षा झालेली नाही. म्हणजेच काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी सलग २ वर्षे कम्बाईन परिक्षेला बसू शकले नाहीत.
४) नुकतेच मा. जबलपूर उच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस साठी ५ वर्षे वय सवलत दिली आहे.
१) दि. ०३ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराचे शासकीय पदभरती करिता कमाल वयोमर्यादा सदर दोन वर्षे इतकी वाढविण्यात आली होती म्हणजे दि. ३१ डिसेंबर २०२३ नुसार कमाल वयोमर्यादा मागास वर्गासाठी ४३ ची ४५ आणि अमागास वर्गासाठी ३८ ची ४० गृहित धरण्यात आली होती. परंतू हा निर्णय सर्वसमावेशक असला तरी कम्बाईन परिक्षा गट ब व क २०२३ ला संधी मिळाली नाही. शिवाय २०२४ या वर्षभरात एकही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. यामुळे १ जानेवारी २०२४ नंतर ज्या सरळसेवा जाहिरातीसाठी सदर उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांना वंचित राहावे लागले आहे. तसेच शासन पदभरतीचा एक भाग म्हणून २०२५ या वर्षामध्ये सुमारे ७५ हजार भरतीची घोषणा नुकतीच शासन पातळीवर करण्यात आली आहे त्यामध्ये बरेच उमेदवार हे वयोधिक होणार आहेत.
२) २०२३ चा शासन निर्णय आणि २०२४ चा शासन निर्णय याचा पूर्णपणे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना फायदा झाला नाही. कारण या निर्णयानुसार देण्यात आलेली वय वाढीव संधी ही प्रत्यक्षात नऊ दहा महिन्यासाठीच मिळाली आणि त्या कालावधीत फक्त एक राज्यसेवा परिक्षा सोडून इतर कोणत्याही परिक्षेची जाहिरात आलेली नाही. तसेच २०२४ ला पण एकही परिक्षा आयोजित झालेली नाही. कम्बाईन गट ब व क तसेच सरळसेवा व्दारा घेण्यात येणाऱ्या इतर परिक्षा देण्याचे प्रमाण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. तरी सर्व स्पर्धा परिक्षा, अंशकालीन कला निदेशक कला,क्रीडा, कार्यानुभव बसण्याकरिता निवेदन देण्यात आले. निवेदनकर्ते रामेश्वर तोंडे, अतुल कुमार विठ्ठल पाचपोळ अनिल सीताफळे, रामदास खंदारे,विजय सुरुशे, राहुल चवरे हे हजर होते.





Social Plugin