Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विष्णू मचाले तर सचिव पदी सचिन खरात पाटील यांनी निवड.



परतुर प्रतिनिधी :- लक्ष्मण बिल्हारे 

     दि. २ रोजी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी विष्णू मचाले तर सचिवपदी सचिन खरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. परतूर येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी शिवजन्मोत्सव समितीची निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे एकमताने ठरवण्यात आले. 

    या समितीमध्ये उपाध्यक्ष शुभम कठोरे, राहुल माने सहसचिव राहुल कदम, कार्याध्यक्ष लक्ष्मण बिल्हारे यांचा समावेश आहे. तसेच सल्लागार म्हणून माधवराव कदम, महेश नळगे, महेश वैजनाथराव आकात, आकाश राक्षे, पांडुरंग नवल, रमेश भापकर,शत्रुघ्न कणसे, अविनाश शहाणे,संपत टकले,बाबाजी घाडगे,ओमकार काटे,विजय नाना राखे, बाबुराव हिवाळे, राजेश भुजबळ,मोहन कुरेशी, अखिल काजी,सावता काळे, मुन्नाभाई चितोडा, अशोक तनपुरे, योगेश बरीदे,भाऊसाहेब मुके, आशिष धुमाळ,अर्जुन जगताप, कृष्णा सोळंके, अमोल सुरुंग, बालासाहेब आकात,दत्ता सुरुंग, विनायक भिसे, सिद्धेश्वर लहाने, व सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बांधव, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना महेश नळगे , आकाश राक्षे, पांडुरंग नवल,ऋषिकेश कऱ्हारे,दिपक कदम,विशाल कदम, आबासाहेब कदम, अविनाश शहाणे, अमोल सुरुंग,गोविंद मुंदडा, संदीप पाचारे,दीपक काळे,विशाल पवार कृष्णा सोळंके, पा.आशिष धुमाळ गणेश गायवळ,विष्णूपंत जगताप, सचिन सोळंके, विजय यादव भानुदास टिप्परकर व शिवप्रेमी उपस्थित होते