Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक : भरधाव आयशर ट्रक ने दिलेल्या धडकेने दुचाकी स्वार ठार झाला.





महाराष्ट्र ग्रामीण न्युज : प्रतिनिधी : संजय भोये : पेठ नाशिक

नाशिक : भरधाव आयशर ट्रक ने दिलेल्या धडकेने दुचाकी स्वार ठार,, हा अपघात महामार्गांवरील बळी मंदिर परिसरात झाला या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मुर्त्यू ची नोंद करण्यात आली आहे,, पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,, विलास हिरामण राऊत ( 33 रा : मोहाचा पाडा, पो : कुंभाळे,,ता पेठ जि नाशिक ) असे मृत दुचाकी स्वार चे नाव आहे,, राऊत गुरुवार दिनांक ( 12 ) रात्री यश लॉन्स कडून बळी मंदिराच्या दिशेने दुचाकी वर प्रवास करीत असताना,, बळी मंदिरा कडून भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रक ने ( एम एच 15 बी जी 5351 ) मालवाहू ट्रक ने दुचाकी स समोरून धडक दिली या अपघातात राऊत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले,, मात्र वैधकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले,, या प्रकरणी हवालदार रांजुळे तपास करीत आहे