Ticker

6/recent/ticker-posts

पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा क्रांतिकारी शेतकरी संघटना मुर्तीजापूरच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी.





 प्रतिनिधी 

वर्ष 2025 मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ढगफुटी सदृश तालुक्यात पाऊस झाला त्यामुळे सर्व तालुक्यातील सोयाबीन तूर पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याची बरेच आर्थिक नुकसान झाले त्याचा सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना तोडकी मदत दिली परंतु शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई ते निकष रद्द केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा झाला नाही परंतु शासनाने ओल्या दुष्काळ परिस्थिती आहे असे जाहीर करून दुष्काळाचे निकष लावू तोडकी मदत दिली नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सर्वांना पिक विमा मिळणार असल्याचे जाहीर केले परंतु त्यावर सहा महिने उलटून सुद्धा पिक विमा संदर्भात कुठली हालचाल दिसत नाही.

 अस्मानी व सुलतानी संकटानि घेरल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिक विमा जमा करावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना मुर्तीजापुर च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हा संघटक राहुल वानखडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर यांच्या मार्फत  मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रियाज भाई,प्रवीण पाटील खोत, संतोष रुद्रकार,रामदास भगत श्याभाऊ पाचळे सचिन देशमुख युवराज घाडगे सह शेकडो क्रांतीकारी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते