Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाणा तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थी यांच्यासाठी .जिल्हा परिषद बुलढाणा प्रकल्प अधिकारी साहेब यांची भेट .



मन्सूरं शहा.:--

बुलढाणा तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थी यांच्यासाठी दिनांक 03/02/2026 रोजी दुपारी 02 वाजता जिल्हा परिषद बुलढाणा प्रकल्प अधिकारी साहेब यांची भेट घेतली भेटीमध्ये  04 महिन्यापासून थकित घरकुल हफ्ते का मिळत नाही यावर चर्चा करण्यात आली असता साहेबांनी येत्या 10 दिवसाच्या आत बुलढाणा तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना अनुदान देता येईल असे सांगितलेयेत्या 10 दिवसात अनुदान जमा न झाल्यास आम्ही घरकुल लाभार्थी

पंचायत समिती बुलढाणा येथे उपोषण करू असे आम्ही सांगितले असता साहेबांनी कळविले की ती वेळ  आम्ही येऊ देणार नाही व लवकरच आम्ही प्रकिया सुरू करत आहों असे आश्वासन देण्यात आले

आज चांडोळ येथील नागरिक उपस्थित होते सदर निवेदन ग्रामपंचायत सदस्य राजू धनावत यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले सदर निवेदनासाठी विशाल देव्हाणे,शेख नजीर ,शेख हक्कानी, शिवाजी जंजाळ, विशाल महेर,अशोक कांबळे, दीपक चांदवडे, समीर खानउपस्थित होते .