ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:शिवजयंतीनिमित्त मल्हार सेवाभावी संस्था संचलित वाघी,ता.नांदेड येथील माजी सैनिक उत्तमराव रोडे उच्च माध्यमिक विद्यालयात सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात वाघी परिसरातील गरजू नागरिकांच्या विविध आरोग्यदायी आजारांबद्दल वैद्यकीय क्षेञातील तज्ञांनी योग्य सल्ला दिला.दरवर्षी असे शिबिर भरविण्यात यावे,अशा भावना सहभागी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.यावेळी कार्यक्रम अध्यक्षा म्हणून संस्थाध्यक्षा सौ.वैशालीताई नांदलगांवकर तर प्रमुख पाहुणे वाघी ग्रामचे सरपंच गणपत राठोड,चंद्रकांत भोसले, डाॅ.उत्कर्ष पांचाळ,डाॅ.उद्धव पिसाळ, डाॅ.नितीन कपाळे,डाॅ.प्रणव मोरलवार,डाॅ.एस.कोकणे,डाॅ.अर्जुन शेळके,डाॅ.लाठकर,डाॅ.तुप्पेकर हे होते.संस्थेचे प्राचार्य शिरगिरे बि.एस.,प्रा.गच्चे सर,प्रा.बालाजी कोकणे,ए.एन.खान व नागरिक उपस्थित होते.संस्था सचिव चंद्रकांत रोडे व प्राचार्य शिरगिरे बि.एस.यांनी सर्वांचे आभार मानले.





Social Plugin