Ticker

6/recent/ticker-posts

रेजिंग डे व स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी सैनिक.तडवळे ( सं . वाघोली ) येथे माजी सैनिकांचा ६१ वा रेजिंग डे उत्साहात.



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे :

 देशसेवा करून मायभूमीत परतलेल्या सहकाऱ्यांची तब्बल पस्तीस वर्षांनी भेट  झाल्याने आनंदित झालेल्या माजी सैनिकांनी नुकताच तडवळे ( सं . वाघोली ) येथील हॉटेल फौजी येथे ६१ वा रेजिंग डे उत्साहात साजरा केला.

माजी सैनिक बाळासाहेब भोईटे यांनी नुकताच जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील माजी सैनिकांचा स्नेहमेळावा व ६१ व्या रेजिंग डे चे आयोजन केले होते. यावेळी पंजाब, आसाम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावलेले माजी सैनिक, कॅप्टन, मेजर, सुभेदार अशा १५० सैनिकांची उपस्थिती होती. यातील काही कॅप्टन, सुभेदार, माजी सैनिकांनी आपले सैन्यातील अनुभव यावेळी

सांगितले. या कार्यक्रमाला पंजाबवरून आलेले माजी कॅप्टन खिमा सिंग यांची खास उपस्थिती होती. त्याच बरोबर कॅप्टन धरमसिंग, नायब सुभेदार राबी सिंग, नायक विक्रमजीत सिंग, कॅप्टन आनदराव लावंड, कॅप्टन किशोर भोसले, डी. यु. देशमुख, प्रभाकर इथापे, सुभेदार पी. बी. हवलदार नितीन घाडगे, अरुण जाधव, अर्जुन जाधव, ए. पी. पवार, चंद्रकात बर्गे आदी माजी सैनिक उपस्थित होते. हॉटेल फौजी येथे झालेल्या या कार्यक्रमात सर्व जवांनासह त्यांच्या पत्नींचा शाल, श्रीफळ, नारळ, साडी देऊन बाळासाहेब भोईटे यांनी सन्मान केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅप्टन किशोर भोसले, डी. यु. देशमुख, अरुण जाधव यांनी परिश्रम घेतले.