महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी महेंद्र खरात
काल झालेल्या वादळी वाऱ्या पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील दुसर बीड मंडळामधील ताड शिवणी गावामध्ये हातात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामध्ये प्रमुख गहू मक्का आणि कांदा तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून व दुसर बीड मंडळातील अधिकाऱ्यांना तात्काळ बांधावर बोलून पंचनामे करून घ्यावे असे आव्हान शेतकऱ्याकडून करण्यात आले आहे
मका गहू कांदा या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे सोबतच आंब्याला आलेला मोहर बारीक लागलेली कैरी ही सुद्धा वादळवाऱ्यामध्ये अक्षरशः आंब्याच्या फांद्या मोडून पडलेल्या आहेत तलाठी साहेब तात्काळ बांधावरून सर्वे करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे ताड शिवणी गावचे सरपंच पदी कैलास विठ्ठलराव भूमकर यांच्याकडून मागणी होत आहे आता सरकार प्रशासनाला शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामाचे आदेश देतात का शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसतात याकडे आता सर्व ताड शिवणी गावच्या सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे





Social Plugin