सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्या जयंतीनिमित्त दत्ता बाळसराफ यांचे व्याख्यान संपन्न
यशवंत पवार कन्नड
जात, विद्वेष मुक्त व नवी शेती, शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत ज्ञानदायी समाजाची उभारणी केली तरच नवा देश अस्तित्वात येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत दत्ता बाळसराफ यांनी सोमवार १६ मार्च रोजी बाळासाहेब पवार वाचनालयात आयोजित व्याख्यानात केले.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त बाळासाहेब पवार वाचनालयात दत्ता बाळसराफ यांचे ' महाराष्ट्र धर्म : काल, आज आणि उद्या ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की, कोठलेही राष्ट्र समजून घेण्यासाठी भौगोलिक आणि सामाजिक संरचना समजून घेण्याची गरज आहे. आज एक धर्म, एक राष्ट्र एक निवडणूक असा मुद्दा पुढे आणल्या जात आहे. पण त्यासाठी चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढावी लागेल. गांधी, आंबेडकरकालीन राजकारणाला शैक्षणिक, नैतिक उंची होती. सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा खरा धर्म आहे हा धर्म जागविण्याची गरज आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, नव तंत्रज्ञान अवगत करूनच नवा महाराष्ट्र उभा राहिल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार किशोर पाटील होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी निलेश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून कन्नड शहराला सांस्कृतिक चेहरा मिळत आहे. या प्रसंगी विचारमंचावर उद्योजक मानसिंग पवार उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ विजय भोसले, वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, डॉ.रूपेश मोरे, प्रा.अभय आहेर कौतिकराव पवार, अॕड. कुंभकर्ण, डॉ. यशवंत पवार, प्रा. रंगनाथ लहाने, कालिदास उपासनी, प्राचार्य राहुल क्षीरसागर, प्रा. भाऊसाहेब मगर,
हुकूमचंद पवार, राजेश नागे, संजय जाधव,प्रा. शिवाजी हुसे, प्रा. प्रतिभा अहिरे, डॉ. उदय डोंगरे , डॉ.संजय भालेराव , प्रा.रणजित पवार,प्रा. प्रकाश खेत्री आदिंसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. अशोक भोसीकर यांनी केले आभार डॉ.रूपेश मोरे यांनी मानले.





Social Plugin