यशवंत पवार @1/03/2026कन्नड
उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे थंड पाणी व सावलीची आवश्यकता सर्वच सजीवांना पडत आहे.
कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्ग मित्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचय असलेले देविदास थोरात यांनी उन्हाळा सुरू होताच दरवर्षीप्रमाणे पशु पक्षांच्या दाणापाणी पानवटे, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निस्वार्थ कार्य सुरू केले आहे. रविवार १ मार्च २०२६ रोजी गावातील जागृत देवस्थान भिकनशावली बाबा परिसरात असलेला अनेक वर्षांपूर्वीचा दगडी पाण्याचा हौद साफसफाई करून स्वच्छ केला आहे. या ठिकाणी वड, जांभूळ कडुलिंब हे वृक्ष आहे. त्यामुळे नेहमी पक्षांचा किलबिलाट या ठिकाणी होत असतो. वास्तव्य आहे. त्यामुळे त्याखाली असलेल्या पाण्याचा हौद स्वच्छ करून भरून ठेवण्यासाठी. एक दिवस पशुपक्ष्यांसाठी देत त्यांनी स्वच्छता अभियान केले आहे. प्रत्येकाने ज्या परिसरात पाण्याची कमतरता आहे व त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचे नेहमी वास्तव्य आहे त्या ठिकाणी आपल्याला जमेल त्या पद्धतीने पाणपोही ठेवावी ,पानवटे करावे असे विनंती निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी व्यक्त केली. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, निस्वार्थ सेवा ,निस्वार्थ श्रमदान करावे. तीच खरी ईश्वर सेवा असते असे मत देखील व्यक्त केले.





Social Plugin