Ticker

6/recent/ticker-posts

तहानलेल्यांना पाणी मिळावे हाच मानवधर्मउमरेड युथ फाउंडेशन द्वारा स्थायी पाणी प्याऊ चा शुभारंभ.

 


 ग्रामीण प्रतिनिधी.भाग्यश्री धकाते उमरेड


माणूस जन्माला येतो तर माणुसकी निर्माण करावी लागते हाच धागा हेरून उमरेड युथ फाउंडेशनने पुढाकार घेत उमरेड युथ फाउंडेशन चे 11 वा वर्धापन दिवस चे औचित्य साधून गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर स्व.विजित मनोहर गुप्ता स्मृतीपित्यर्थ स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज व्यावसायिक संकुल,इतवारी मेन रोड येथे हरिओम टायर्स चे संचालक मनोहरजी गुप्ता यांच्या विशेष सहकार्याने स्थायी पाणी प्याऊ सुरू करण्यात आला.उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी मिळावे याकरिता सुरू केलेला पणपोईचा उपक्रम माणूसधर्म सांगणारा असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी प्रास्ताविक मार्गदर्शन यांनी केले.

तहानल्यांची तहान भागविण्यासाठी उमरेड युथ फाउंडेशन द्वारा स्थायी पाणी प्याऊ चा शुभारंभ माजी आमदार सुधीर पारवे,नागपूर जिल्हा कृषी व्यापारी संघटनेचे दामोधर मुंधडा, उमरेड किराणा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष अशोक मने,ज्येष्ठ उद्योजक शंकर तोलानी ,रुपचंद गोविंदानी,श्रीगणेशा व्हाईट गोल्ड चे संचालक सुभाष गुप्ता,शिवस्नेह गणेश उत्सव मंडळ चे अध्यक्ष प्रशांतकुमार जयस्वाल,नगर काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष सुरेशबाबू पौनिकर,भारतीय उत्कर्ष मंडळाचे सहसचिव दत्तात्रय तोटवार, यांच्या हस्ते करण्यात आला.प्रसंगी उमरेड युथ फाउंडेशन चे संयोजक सचिन कुहिकर,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दिपक पटले अध्यक्ष मनिष बालपांडे,विजय जसवानी,रोशन पोकळे,स्वप्नील लाडेकर,सतीश तांबेकर,रितेश राऊत,प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम संचालन संजय चाचरकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदीप चिंदमवार यांनी मानले.यशस्वितेसाठी विक्रांत वरघणे,,सचिन जोधे,नितेश वैद्य सौरभ भिवगडे,उज्वल चिंदमवार,सतीश चकोले,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,विशाल बावणे , मनिष सहारकर यांचे योगदान लाभले.