Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय म्हस्के यांची संजय गांधी निराधार योजनेच्या नांदगाव खंडेश्वर तालुकास्तरीय समितीवर निवड



आकाश रुमणे 

नांदगाव खंडेश्वर : दिनांक 27,महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरीय समितीवर अक्षय म्हस्के यांची नुकतीच निवड करण्यात आली

आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षय म्हस्के हे धनगर समाजाचे सक्रिय व लोकप्रिय समाजसेवक म्हणून ओळखले जातात. समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांची या महत्त्वाच्या समितीवर निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील गरजू व निराधार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.