सतीश पांडे
कळमेश्वर : येथील श्री सदगुरु साई मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. २४ मार्च ते २७ मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच दरवर्षीप्रमाणे श्री राम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
उत्सवाच्या निमित्ताने दि. २४ मार्च रोजी खुशाल महाराज वैद्य यांचे भारूड, दि. २५ मार्च रोजी दीपक महाराज भांडेकर यांचे सप्त खंजिरी कीर्तन आयोजित करण्यात आले. दि. २६ मार्च रोजी श्री साई पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच दि. २७ मार्च रोजी ह.भ.प. श्री सचिन काळे महाराज यांच्या हस्ते गोपाल काल्याचे कीर्तन संपन्न झाले.
या सर्व कार्यक्रमां दरम्यान महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविकांनी त्याचा लाभ घेतला. कार्यक्रमस्थळी श्री साई मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अतुल सरोदे अध्यक्ष, विवेक धोटे उपाध्यक्ष,संजय कानफाडे कोषाध्यक्ष, व प्रवीण अगंदवार, प्रभाकर राऊत, अभय डफरे सदस्य उपस्थित होते. कळमेश्वर नगरीतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.





Social Plugin