ग्रामीण प्रतिनिधी : बिलोली
बिलोली - तालुक्यातील अतिशय शांत, संयमी, मनमिळावू वृत्ती, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेले आमचे सहकारी बंधू पत्रकार माधव दादा एडके यांना जनजागृती संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा न्याय चक्र पुरस्कार पत्रकार जाहीर कण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी निवडीचे सन्मानपूर्वक पत्र देवून दि. २९ मार्च रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रमास सहकुटुंबासह उपस्थित राहवून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले आहे.
बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र माधव शंकरराव एडके यांनी मागील वीसवर्षापासुन पत्रकार क्षेत्रात विविध वृतपत्र व वृत्त वाहिनीच्या माध्यमातून सामाजिक दूरदृष्ट्या शोषित व शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत दखल घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी बजावून न्याय देण्याचे कार्य केले आहे.या कार्याची लोक जनजागृती संस्थेने दखल घेत माधव एडके यांना मानाचा न्यायचक्र गौरवपुरस्कार जाहीर केला आहे. यापुरस्काराचे वितरण २९ मार्च रोजी नांदेड येथील देवकृपा फंक्शन हॉल छत्रपती चौक येथे लोक जनशक्ती पक्षाचे खा.अरुण भारती यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आाहे. एडके यांची न्याय चक्र पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल बिलोली तालुक्यातून पत्रकार व सामाजिक स्तरावरून माधव एडके यांचं अभिनंदन केले जात आहे.





Social Plugin