Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा ; अफवांवर विश्वास ठेवू नये.जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन.



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : मागील दोन दिवसापासून तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर भयानक गर्दी असून पेट्रोल,डिझेल घेण्याकरिता मोठ्या रांगा लागताना दिसत असून युद्धामुळे पेट्रोल डिझेलवर परिणाम होईल का या प्रश्नामुळे सर्वच वाहनधारक पेट्रोल डिझेल साठवून ठेवण्यासाठी मग्न आहे .मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या तीनही कंपन्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. तसेच या कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा नियमित आणि सुरळीतपणे पुरवठा करण्यात येणार असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि संबंधित ऑईल कंपन्या एकत्रितपणे जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहेत. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून न जाता अनावश्यक गर्दी टाळावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.