Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी पदवी सोबत कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे....

 


छायाचित्र - पुसेगाव -कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.प्रमोद पांडव व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर,.के.के. घाटगे,माजी प्राचार्य डॉ.के.एम. नलवडे,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, १०८प.पू.श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज,श्री.समीर देशमुख श्री. अशोक सावंत प्रा.सौ.उज्वला मदने, प्रा.डॉअनिल जगताप प्रा.डॉ.आर.पी.भोसले छाया - प्रकाश राजेघाटगे बुध 

डॉ प्रमोद पांडव 

उपकुलसचिव, संलग्नता विभाग शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर .

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पदवी बरोबर विविध कौशल्य आत्मसात करून येणाऱ्या काळातील विविध आव्हाने स्वीकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव यांनी केले.   पुसेगाव येथील ,कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, के‌.के.घाटगे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, महाविद्यालय विकास समिती सदस्य माजी प्राचार्य डॉ. के.एम. नलवडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य १०८प.पू.श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज,श्री.सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री.अशोक सावंत प्रा.डॉ. आर.पी.भोसले जिमखाना विभाग कार्याध्यक्षा प्रा. सौ उज्वला मदने प्रमुख प्रा.गौरव जाधव प्रा.डॉ.अनिल जगताप, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री.समीर देशमुख इ. मान्यवर उपस्थित होते. पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले ," विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वतःचे वेगळेपण सिद्ध करावे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा, योजना आणि युवा महोत्सव ही विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता दाखविण्याची उत्तम संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मोबाईलचा वापर कमी करून अभ्यास व व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांना नावलौकिक प्राप्त होऊ शकतो,विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विनयशीलता, सातत्य आणि परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जीवनात ध्येय निश्चित करून अपयशाला घाबरू नये, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.अध्यक्षीय भाषणात १०८  प.पू.सुंदरगिरी महाराज म्हणाले ,'विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, विविध विषयांचे वाचन व चिंतन करावे,असे आवाहन केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्ञान संपादन करून उज्वल भविष्य घडवावे,असे त्यांनी सांगितले.

यावेळी क्रीडा क्षेत्रातील, सांस्कृतिक विभागातील, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील, महाविद्यालयातील गुणवंत व यशवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय  व प्रास्ताविकामधून महाविद्यालय स्थापनेची माहिती, शैक्षणिक व भौतिक सुविधांची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांनी दिली.क्रीडा विभागाचे अहवाल वाचन जिमखाना विभाग प्रमुख प्रा.सौरभ जाधव यांनी केले.महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीच्या अहवालाचे वाचन कार्याध्यक्षा प्रा.सौ.उज्वला मदने यांनी केले.आभार प्रा.डॉ.आर.पी. भोसले यांनी मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.