Ticker

6/recent/ticker-posts

मायबाप सरकार दुजाभाव करू नका



मराठवाडा - विदर्भातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका -संजय मोरे पाटील . 

टेंभुर्णी प्रतिनिधी

विष्णु मगर

          मायबाप सरकार दुजाभाव करू नका. मराठवाडा - विदर्भासह राज्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपयाची मदत द्या अशी आंबा उत्पादक शेतकरी व ॲग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांनी गरज व्यक्त केली आहे.

      हवामान बदलामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या आंबा फळपीक उत्पादकांनी फळपीक विमा काढला नाही त्यांना हेक्टरी बावीस हजार रुपयाची मदत देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु ही मदत जाहीर करतांना सरकारकडून पक्षपात झाला असून केवळ कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाच या मदतीचा लाभ सरकार देणार आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसह  राज्यातील अन्य आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने सध्या तरी या मदतीपासून दूर ठेवले आहे. कोकणासह उर्वरित महाराष्ट्रातही आंबा फळपिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. यातील बहुतांश बागा आता उत्पादनक्षम झाल्या आहेत. यावर्षी या सर्वच बागा मोहरांनी कधी नव्हे एवढ्या बहरल्या होत्या. यावर्षी मोठ्या प्रमाणात आंबा फळाच्या माध्यमातून उत्पादकांच्या खिशात अधिकचे दोन पैसे येथील असे दिसत असतानाच अचानक हवामान बदलले.

परिणामी झाडावरील मोहर झाडावरच अक्षरश: वाळून गेला. जो थोडाफार मोहर राहिला त्याला अत्यल्प फाळधारणा झाली. ती लहानफळेही झाडावरून गळून पडली. आता झाडावर तूरळक फळे दिसतात. या हवामान बदलाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. त्यातच शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना शासनाने तुटपुंजी का होईना पण केवळ कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. सरकारने केवळ कोकणापूरती मदत न करता सरसकट सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना किमान हेक्टरी एक लाख रुपये देण्याची गरज आहे. आंबा फळपीक हे अत्यंत जोखमीचे फळपिक आहे. त्याचा उत्पादन खर्चच एक्करी किमान सरासरी एक लाख रुपयापेक्षा अधिक आहे. सरकारने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही मदत देण्याची आवश्यकता आहे. 

      महाराष्ट्रातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी किमान एक लाख रुपयाची मदत देण्याची गरज असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापकपरिणामी झाडावरील मोहर झाडावरच अक्षरश: वाळून गेला. आता झाडावर तूरळक फळे दिसतात. या हवामान बदलाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. त्यातच शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना शासनाने तुटपुंजी का होईना पण केवळ कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. सरकारने केवळ कोकणापूरती मदत न करता सरसकट किमान हेक्टरी एक लाख रुपये देण्याची गरज आहे. आंबा फळपीक हे अत्यंत जोखमीचे फळपिक आहे. त्याचा उत्पादन खर्चच एक्करी किमान सरासरी एक लाख रुपयापेक्षा अधिक आहे. सरकारने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही मदत देण्याची आवश्यकता आहे. 

      महाराष्ट्रातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी किमान एक लाख रुपयाची मदत देण्याची गरज असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांनी सांगितले.