Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवार सामाजिक बांधिलकी जपणारी नेतृत्व आहे.... डॉ. विजय चोरमोरे



 छायाचित्र - पुसेगाव -  कला व वाणिज्य महाविद्यालयात खासदार शरद पवार यांचे राष्ट्रबांधणीतील योगदान'राष्ट्रीय परिषदेमध्ये दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना डॉ.विजय चोरमोरे व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिट) प्रिं.डॉ.राजेंद्र मोरे, डॉ.आर. पी .भोसले, डॉ.अनिल जगताप, प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल छाया - प्रकाश राजेघाटगे बुध

बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सामाजिक बांधिलकी जपत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी देशपातळीवर 33% आरक्षण लागू करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे प्रतिपादन डॉ. विजय चोरमोरे यांनी केले. पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात 'शरद पवार यांचे राष्ट्रबांधणीतील योगदान 'या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेतील पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिट) प्रिं.डॉ.राजेंद्र मोरे, प्रा.डॉ.आर.पी. भोसले, प्रा. अनिल जगताप, प्रा.डॉ. दत्तात्रय काळेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात डॉ.चोरमोरे म्हणाले,' शरद पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या प्रश्नाकडे आपुलकीने पाहण्याची कार्यपद्धती असल्याचे सांगितले.

 आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पनाची मांडणी ही त्यांची दूरदृष्टी असल्याचे सांगताना राज्यस्थान सरकारच्या  धर्तीवर आदिवासी स्वतंत्र आर्थिक बजेट  तरतूद करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता.  देशाचे कृषिमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या सुमारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून संकट काळात त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. क्रीडा, संस्कृती क्षेत्र आणि युवकांच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भटक्या व विमुक्त जाती जमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेला आधार विशेष महत्त्वाचे असल्याचे नमूद करत 'राज्यकर्त्यांची खरी ओळख म्हणजे दबलेले व वंचित घटकांना न्याय देणे 'असे मत त्यांनी व्यक्त केले.

 शरद पवार यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. विज्ञाननिष्ट विचारसरणी असलेले राजकर्ते म्हणून शरद पवार यांचे देशाच्या राजकारणात मोठे योगदान आहे. अध्यक्षीय भाषणांमधून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिट )यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून शरद पवारांचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये संगणक शिक्षणाची सुविधा निर्माण केली. त्यासाठी निधी उभा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक गुणवत्ता आराखडा तयार केला. कृषी, उद्योग, सहकार, संरक्षण आदि विविध क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी राष्ट्राच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरली असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आर्थिक क्षेत्रात शरद पवार यांनी केलेले कार्य राष्ट्राच्या विकासाला बळकटी देणारे असून त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक क्षेत्रात विकासाला गती मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ.अनिल जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश आवळे यांनी केले तर आभार प्रा.डाॅ. किरण कुंभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी संशोधक प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.