Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत पुरळ यांचा केळेये वाडी डोंगर घाटी चा रस्ता दुरुस्त करण्यात दिरंगाई



प्रतिनिधी देवगड अमोल शिर्के  

गाव पुरळ कलंबई केळेये वाडी येथे डोंगर माथ्याचा घाटीच्या रस्त्याचे काम माननीय सरपंच यांनी उद्घाटन  करून रस्त्याचे काम रखडताना दिसले गेलेले आहे. रस्त्याचे काम अपुरे का याचे कारण अद्याप ग्रामस्थांना कळलेले गेलेले नाही. रस्त्याचे काम सुरू झाले आणि अर्धवट रस्त्याचे काम मध्येच बंद करण्यात आले. डोंगर माथ्यावर जेसीपी ने डोंगर तोडण्यात आला. ते काम पूर्ण करायचे सोडून अर्ध्यावरच ते काम कॉन्ट्रॅक्टरने सोडून गेलेले आहे. अनेक ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. रस्त्याचे काम अर्धवट का केले याचा जाब सुद्धा ग्रामपंचायत समितीला विचारण्यात आला . मग अशी दिरंगाई का हा अनेकांनी ग्रामीण सदस्यांनी लोकांनी त्यांना विचारला प्रशासनाचा हा कारभार कसा आहे 

तो सुद्धा निदर्शनात यावा म्हणून अनेक लोकांनी हे काम का रखडलं याची चौकशी व्हावी ही विनवणी ग्रामपंचायतचे सरपंच त्याचप्रमाणे नगरपंचायतचे समितीत निवडून आलेले संजय बोंबडी यांना सुद्धा कळवले गेलेले आहे तरीसुद्धा त्याची दखल घेतली जात नाहीये. मध्येच रस्त्याचे काम अर्धवट सोडून रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना, रिक्षा टेम्पो यांना सुद्धा डॉक्टर कडे जाणाऱ्या लोकांना त्रास होत आहे असा हा पुरळ  ग्रामपंचायतचा बेजबाबदार पणा कसा आहे तो तुम्ही लक्षात घ्या.  शिमग्याच्या होळीच्या सणाच्या वेळेला अगोदर हा रस्ता फोडण्यात आला  आणि तो रस्ता अर्धवट काम करून कॉन्टॅक्टर टाकून गेला याला राजकारण म्हणावं की ग्रामीण विकास म्हणावा हे ग्रामपंचायतच्या समितीने व त्या सरपंच आणि नगर पंचायत मध्ये निवडून आलेले संजय बोंबडी यांनी लक्षात घ्यावे. गाव पुरळ ग्रामपंचायत चा गलथनपणा किती आहे हे या अर्धवट कामामुळे दिसण्यात येत आहे. तेव्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन ग्रामपंचायत वर दक्षता समिती ठेवून त्याचे कामकाज कसे चालते त्यांचे लोक पदाधिकारी कसे कामकाज करतात याच्यावर करडी नजर ठेवी कारण ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आधीच गावचे लोक त्या परीने उपाययोजना करत असतात ग्रामपंचायतचे व्यवहार व्यवस्थित व्हावे त्याचे कामकाज नीट व्हावे याचा लक्ष स्थानिक ग्रामस्थ देत असतात तेव्हा गाव पुरळ कलंबई  केळये  वाडी हा रस्ता अजून दुरुस्तीला का घेतला नाही याची अद्याप कारण कळलेले नाही. आपल्याकडे फंड नाही आपल्याकडे कामगार नाही या सबबी असतील तर तो रस्ता च काम घ्यायलाच नाही पाहिजे होतं. तेव्हा हा कटाक्ष ग्रामपंचायत पुरळ या समितीने  यांनी घेतला पाहिजे की आपल्याकडे निधी व आपल्याकडे मनुष्यबळ आपल्याकडे किती आहे याचा अंदाज करून ग्रामीण विकास करण्याचा साधावा. जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही लोकांना त्रास होणार नाही याचा कटाक्ष ग्रामपंचायतनी घ्यावा. 

तसेच रस्त्याचे काम करताना येथील कॉन्टॅक्टर सुद्धा व्यवस्थित नेमलेले दिसले गेलेले नाही. रस्त्याच्या मजबुतीकरण रस्त्यांच्या डांबीकरणांमध्ये भेसळपणा हा सुद्धा ग्रामपंचायत पुरळ यांच्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण विकासामध्ये दिसण्यात आलेला आहे. अतिशय बेजबाबदार पणाने रस्त्याचे काम करणारे कॉन्टॅक्टर डांबरात सुद्धा भेसळपणा करून निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करतात असे दिसण्यात आलेले आहेत तेव्हा प्रशासनाने याच्यावर सुद्धा करडी नजर ठेवण्यात यावी असे ग्रामीण स्थानिक ग्रामस्थ  यांचे मत आहे. कॉन्टॅक्टर जे नेमतात ते डांबराच काम निकृष्ट दर्जाचा असं करताना दिसलेले आहेत त्यांच्यावर वेळीच कठोर पावला उचलण्यात यावी ही नम्र विनंती. असा हा भ्रष्टाचार ग्रामपंचायत पुरळ मध्ये दिसण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अर्ज काही ग्रामीण विकासाचे केले की लवकरात लवकर पूर्ण होत नाही त्याला जवळजवळ एक अर्ज दिला की कुठच्याही संदर्भात ग्रामीण विकासाच्या की तो पाच वर्षांनी किंवा होतच नाही पूर्ण ते काम अपूर्णच राहते तेव्हा ग्रामपंचायत मध्ये हा कारभार अपूर्ण का  का याचा सुद्धा निष्कर्ष व छडा लावण्यात यावा ही प्रशासनाला नम्र विनंती. आणि बेजबाबदार  व भेसळपणा करणारे कॉन्टॅक्टर यांना तुम्ही काम देऊ नये असे ग्रामपंचायतीला नम्र विनंती  तेव्हा ग्रामपंचायत पुरळ याने आपले ग्रामीण विकासासंदर्भातले कार्य हे कर्तव्यदक्ष असे समजून व्यवस्थितपणे प्रत्येक गावागावात व वाडी वाडीत ग्रामीण विकास हा व्यवस्थित व त्यांची रखडलेली जी काही काम असतील ती पूर्ण करण्यात यावी ही नम्र विनंती.