ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:अगदी तरुण वयात पतीच्या निधनाने संसाराचा आधार हरपला, अर्धवट संसाराची जबाबदारी खांद्यावर आली; तरीही न खचता आपल्या कष्टाच्या बळावर लहान मुलांना सांभाळत, त्यांना चांगले घडविण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या,राबणाऱ्या बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील कर्तृत्ववान व कष्टाळू महिलांचा रविवार दि.८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिना'चे औचित्य साधत त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ व छोटीशी भेट देऊन त्यांचा यथोचित मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला.
समाज जीवनात वावरत असताना नकारात्मक विचारांना पाठीशी घालत यशस्वी केलेली वाटचाल ही खरोखरी प्रेरक अशीच आहे.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य,जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मुलांचे जीवन उज्ज्वल करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या श्रीमती प्रेमलाबाई इरवंत टेंकाळे (हलबुर्गे), सरुबाई गंगाधर भुरे आणि शमीमबी अलीम शेख यांच्या कष्टमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाला यावेळी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिजीत महाजन,सौ. हेमलता देमेवार, सौ. नयना जोशी, ऊर्जा महाजन,शंकरराव मालीपाटील, राजेश लुटे गुरूजी,तरूण भारत पञकार जाफर आदमपूरकर, राम हलबुर्गे,राजेश मुंडकर व गणेश पाटील (लिंबुरे) यांची उपस्थिती होती.





Social Plugin