Ticker

6/recent/ticker-posts

IPL 2026 : रिंकु सिंह याला लॉटरी, थेट केकेआरच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी



Kolkata Knight Riders Ipl 2026 : कोलकाता नाईट रायडर्सने 19 व्या मोसमाआधी मोठी घोषणा केली आहे. केकेआरने उपकर्णधारपदी रिंकु सिंह याची नियुक्ती केली आहे.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची लगबग जोरात सुरु आहे. स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाचा थरार हा 28 मार्चपासून रंगणार आहे. सर्व 10 संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. विस्फोटक फलंदाज रिंकु सिंह याचं प्रमोशन झालं आहे. रिंकु सिंह याची कोलकाता नाईट रायडर्सच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.