Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनाचा सोमवारी पुसेगाव येथे शेतकरी आक्रोश रस्ता रोको - प्रताप जाधव

   


  

  बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे] 

श्रेया घ्या , पाणी पूजन करा, सत्ता भोगा, पक्ष्यांची मोठी पदे घ्या  ,परंतु शेतकऱ्याचा अंत पाहू नका त्यांचे अश्रू तुम्हाला माफ करणार नाहीत असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव यांनी दिला आहे .                प्रताप जाधव पुढे म्हणाले की ,मतदार संघाला दोन आमदार असताना सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास दोन्ही लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहे . तुमच्या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईत शेकडो हेक्टर क्षेत्र वाळून चाललेला आहे . खटाव माणसाठी वरदान  ठरणारी जिहेकठापूर योजना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झालं ,परंतु श्रेयवाद लढाईत येरळमाई कोरडी पडली . अडीच हजार सेक्टर क्षेत्र पाणी विना करपून गेले आहे . या भागात भरपूर पाणी उपलब्ध असताना देखील येरळानदीला पाणी सोडले जात नाही . नक्की यास कोणते कारण ? एक आमदार, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत व दुसरे आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत , तरीसुद्धा या प्रश्नाकडे दुर्लक्ष का होत आहे  .पाणी येणार म्हणून लोकांनी आपल्या क्षेत्रात बागायती पिके घेतली  परंतु आता डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे  या या सर्व निषेधार्थ सोमवार दि .२७ रोजी   सकाळी१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसेगाव येथे शेतकरी आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आंदोलन स्थळी आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती आहे . या आंदोलनात गट तट न पाहता सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा द्यावा असे आवाहान असे  शिवसेना तालुका प्रमुख संजय  बापू नागरे ,यशवंत जाधव, क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे सर  जिल्हा नियोजनचे आर्जुन मोहिते ,महिला आघाडी सुमित्रा शेडगे, अनिता काळे, उप तालुका प्रमुख मुगुटराव कदम ,आमिन आग्गा, युवा सेनेचे गणपत लावांड ,संजय नलवडे, विश्वास नलवडे, संभाजी नलावडे ,अनिल किरवे विभाग प्रमुख आगाशे , पुसेगाव शहर प्रमुख आकाश जाधव  व शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे .