मन्सूर शहा धोत्रा.भंनगोजी.:--
चिखली -: तालुक्यातील तेल्हारा येथील वृद्ध आजी गेल्या कित्येक वर्षा पासून निराधार जीवन जगत असल्यामुळे ग्रामपंचायत तेल्हारा च्या शिफारस पत्रावरून मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला.
सविस्तर असे की आजीला एकच मुलगा होता तो वयात आला आणि काळाने झडप घालत त्याला एका अपघातात तिच्यापासून कायमचच दूर केले तरुण मुलगा गेल्याचे दुःख तिच्या पतीला सहन न झाल्यामुळे गत काही दिवसातच आयुष्याच्या जोडीदाराला सुद्धा निसर्गाने तिच्यापासून हिरावून घेतले. पती गेल्यानंतर पायलीभर गणगोत असून सुद्धा कोणीही सहारा न देता फक्त सहानुभूती दर्शवित अत्यंत गरिबी परिस्थितीत सुद्धा मोलमजुरी करून स्वतः चा उदरनिर्वाह करीत उतार वयात एके दिवशी टोंगलळयावर पडण्याचा बहाणा झाल्यामुळे एका पायाने अधू झाल्या तेव्हापासून संगीता बाई ठोंबरे यांची त्यांची वेळोवेळी काळजी घेतली तसेच गावातील काही चांगल्या लोकांनी मदत हि केली परंतु हे नेहमीच असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले व जवळचे इतर नातेवाईक असून पण कोणीच सांभाळ करण्यासाठी तयार नसल्याने संगीताबाई ठोंबरे यांनी मानवसेवा प्रकल्प चे प्रशांत डोंगरदिवे यांच्याशी संपर्क केला व त्या आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यासाठी विनंती केली. त्यानुसार ग्रामपंचायत चे शिफारस व संगीताबाई ठोंबरे यांच्या विशेष सहकार्य मुळे त्या निराधार अपंग वयोवृद्ध आजीची सर्व वैद्यकीय तपासणी करून रीतसर पोलीस स्टेशन चिखली येथे माहिती देण्यात आली नंतर मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला यावेळी चिखली पोलीस स्टेशनची विशेष मदत मिळाली त्यात खुपियाचे विष्णू नेवरे, म्हस्के ताई, तेल्हारा बिट चे सुसर साहेब, संगीता ठोंबरे, फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती चे कोषाध्यक्ष सुमेध जाधव, सुधाकर कुटे, सतीश भुतेकर,यांची उपस्थिती होती. त्या आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देऊन तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्विकारल्या बद्दल मानवसेवा प्रकल्प चे प्रशांत डोंगरदिवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





Social Plugin